मेष : आर्थिक लाभ
व्यवसाय-नोकरीत मनातील इच्छा सफल होतील. काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. कल्पकता दाखवून कामे उरकाल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्वासाने केलेली कृती कौतुकास पात्र होईल. महिला मोठ्या खुबीने कौटुंबिक प्रश्न मार्गी लावतील. राजकारणी, कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.
वृषभ : दैवाची साथ
दैवाची साथ मिळेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. अनपेक्षित फायदा मिळवून देणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नोकरीत बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्याल. तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. महिलांचा खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठीच असेल. आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. तरुणांचे विवाह जमतील.
मिथुन : संधीचे सोने करा
चित्त स्थिर नसल्याने तळ्यात-मळ्यात राहाल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. कर्तव्यपूर्तीला महत्त्व द्या. नोकरीत मिळालेल्या संधीचे सोने करा. वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवा. कुटुंबासमवेत दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. महिलांना वस्तू, दागिने खरेदीचा मोह होईल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. पैशांचे व्यवहार जपून करा.
कर्क : तडजोडीचे धोरण ठेवा
काहीतरी भव्य-दिव्य करण्याची सुप्त इच्छा राहील; परंतु सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे जा. व्यवसायात धोरणी राहून कामे संपवा. पैशांची तजवीज करावी लागेल. नोकरीत नवीन अनुभव येतील. कामाचा ताण वाढला तरी चिडू नका. महिलांनी हातून चुका होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. तसेच, तडजोडीचे धोरण ठेवून इतरांशी वागावे. मानसिकतेला जपावे.
सिंह : सुवार्ता कळेल
“हाती घ्याल ते तडीस न्याल’. व्यवसायात प्रत्येक काम वेळेत पूर्ण करून यश मिळवाल. पैशांची आवक वाढेल. तुमचे आखलेले आडाखे अचूक येतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. सुवार्ता कळेल. नवीन कामाची संधी मिळेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल.
कन्या : आत्मविश्वास वाढेल
काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी सोडावे लागते, याची प्रचिती येईल. व्यवसायात योग्य निर्णय घेऊन कृती करावी लागेल. कामात कर्तव्यदक्ष राहणे आवश्यक ठरेल. नोकरीत प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवणे फायद्याचे होईल. कामानिमित्ताने प्रवास घडेल.नवीन ओळखी होतील. महिलांना मनाची एकाग्रता साधता येईल. आत्मविश्वास वाढेल.
तूळ : पैशांची चिंता मिटेल
तुम्ही व्यवहारात इतरांचे सहकार्य कसे मिळवता, यावर यश अवलंबून राहील. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. पैशांची चिंता मिटेल. नोकरीत हातून चांगली कामे पार पडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. वरिष्ठांच्या मर्जीत राहून फायदा मिळेल. महिलांना आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल.
वृश्चिक : यश मिळेल
“प्रयत्ने वाळूचे…’ या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात मेहनत व चिकाटीने अशक्यप्राय कामे शक्य करून यश मिळवाल. कामाचा उरक दांडगा राहील. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. नोकरीत कार्यक्षमता वाढवून कामे कराल. बेफिकीर राहून चालणार नाही. महिलांना तात्त्विक वादविवादांना सामोरे जावे लागले, तरी डोके शांत ठेवा.
धनू : आर्थिक स्थिती समाधानकारक
व्यवसायात आश्वासने देताना आपली कुवत ओळखून सावधगिरीने आश्वासन द्या व ते पाळा. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका. नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्तीची विश्वासार्हता पडताळून बघा. घरात अतिविचार न करता कृतीवर भर राहील. प्रियजनांच्या भेटीचे योग. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण पडेल.
मकर : चांगली बातमी कळेल
कामात विनाकारण झालेली धावपळ, दगदग कमी होईल. कामातील त्रुटी भरून निघतील. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. अनपेक्षित खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांचे दुटप्पी धोरण तुम्हाला बुचकळ्यात टाकेल. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल. घरात टाळता न येणारे खर्च होतील. पैशांची तजवीज करून ठेवावी. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.
कुंभ : अनपेक्षित लाभाची शक्यता
अतिविचार न करता बेधडक निर्णय घेण्याकडे कल राहील. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी ठोस उपाय योजाल. कमी श्रमात जास्त यश मिळवाल. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. अचूक पारख करून कामे मिळवाल. कामात सुधारणा होईल. घरातील तणावाचे वातावरण कमी होईल. सहजीवनाचा आनंद घेऊ शकाल.
मीन : जोडधंद्यातून जादा कमाई
सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव घ्याल. व्यवसायात कामात प्रगती असली तरी फायदा मिळवायला वेळ लागेल. पैशांची थोडी चणचण भासेल. मनाला पटेल-रुचेल तीच कामे करावीत. नोकरीत मात्र नको त्या कामात वेळ जाईल. जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. कामानिमित्ताने प्रवासयोग. घरात तुम्ही तुमचे विचार परखडपणे मांडाल. मात्र, शब्द हे शस्त्र आहे, हे लक्षात ठेवा. आरोग्य सुधारेल.