मुंबई – मॉडेलिंगच्या दुनियेपासून फिल्म इंडस्ट्री असा प्रवास करणाऱ्या रकुल प्रीत सिंगला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. रकुल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रोजच चर्चेत असते. रकुलने अनेक अभिनेत्यासोबत काम करूनही ती अद्याप मॉडेलिंग विसरलेली नाही. म्हणूनच अनेक सुंदर फोटो ती आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट करत असते.
रकुल प्रीत तिच्या कामामुळे तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असते. नुकतीच, अभिनेत्री तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत दिसून आली. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरम्यान, तिने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. जे सर्वत्र व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये रकुलचा ट्रॅडिशनल अवतार पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. गोल्डन कलर वर्क असलेल्या या लेहेंग्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.रकुल नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेते. यावेळीही तिच्या या शानदार अवताराने सर्वांनाच वेड लावले आहे.अनेकांनी तिच्या या लूकवर जोरदार कमेंट देखील केल्या आहेत. एकाने दिवाळी स्पेशल लूक का ? असा सवाल तिला विचारला आहे. तर एकाने रूप तेरा मस्ताना अशी कमेंट केली आहे.