मुंबई – बॉलीवूडचा तडफदार दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शेट्टी लवकरच त्याच्या आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ला सुरुवात करणार आहे, ज्याची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी रोहित शेट्टी आणि अजय देवगणने ‘सिंघम अगेन’ची जोरदार तयारी सुरू केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास बनवण्यासाठी दिग्दर्शक कोणतीही कसर सोडत नाहीत. यासाठीच रोहित शेट्टीने मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट घेतल्याचे समजते.
रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांनी केलेला सिंघम हा एक आगळा वेगळा ऍक्शनपट आहे. सिंघम अंडी सिंघम रिटन्स अशा दोन्हही पार्टला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळे रोहित शेट्टी यांनी आता सिंघम अगेनची तयारी केली आहे. या चित्रपटात अजय देवगनचा धडाकेबाज अंदाज पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
सध्या हा चित्रपट प्री-प्रॉडक्शन स्टेजवर आहे आणि येत्या काही महिन्यांत त्याचे चित्रीकरण सुरु होणार आहे. यासाठीच रोहित शेट्टी मॉरिशसमध्ये दिसले होते, जिथे त्यांनी पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांची भेट घेतली.खुद्द प्रविंद जगन्नाथ यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
रोहित शेट्टी ऑक्टोबरपासून मॉरिशसमध्ये त्याच्या चित्रपटाचं शूटिंग करणार आहे. मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत दिग्दर्शकाची ही पहिली भेट नव्हती. 2015 मध्ये, जेव्हा तो त्याच्या दिलवाले चित्रपटासाठी मॉरिशसमध्ये गेला होता, तेव्हा शेट्टीला मॉरिशसचे तत्कालीन पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांना भेटण्याची संधी मिळाली. सध्याच्या पंतप्रधान असलेल्या प्रविंद यांचे ते वडील आहेत.