नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय सराफात बुधवारी सोन्याचा दर 30 रुपयांनी वाढून 50,818 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 133 रुपयांनी वाढून 61,717 रुपये प्रति किलो झाला.
या संबंधात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर कमकुवत झाल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांकडून सोन्याची खरेदी गेल्या काही दिवसापासून वाढली आहे.
त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,848 डॉलर चांदीचा दर 22.02 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. सध्या शेअर बाजाराबरोबरच सोने-चांदी बाजारांमध्ये कमालीची अस्थिरता असल्याचे त्यांनी सांगितले.