पिंपरी, दि. 21 – ताथवडे येथील ग्रॅव्हिटी बॅडमिंटन हॉल येथे औद्योगिक क्रीडा संघटनेच्या 59 व्या बॅडमिंटन स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेत नामांकित कंपन्यांमधील शंभराहून अधिक पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग घेतला.
दोन दिवस चालणारी ही स्पर्धा थिसेनकृप कंपनीने आयोजित केली आहे. ही स्पर्धा पुरुष एकेरी, दुहेरी, महिला एकेरी, दुहेरी, प्रौढ एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा विविध गटामध्ये खेळली जाणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वसंत ठोंबरे, औद्योगिक क्रीडा संघटनेचे नरेंद्र कदम, हरी देशपांडे, विजय हिंगे, प्रदीप वाघ, भानू कुलकर्णी ,कौतुभ नाडगौडा उपस्थित होते. स्पर्धेत टाटा मोटर्स, प्राज, थरमॅक्स, ऑर्डनन्स फॅक्टरी, बजाज ऑटो – आकुर्डी, बजाज ऑटो – चाकण, एनप्रो, एसकेएफ, फ्लॅश, थिसेन कृप, फौरेशीया, डॉन्फॉस, सिग्मा,हिंदुस्तान अँटिबायोटिक्स आदीे कंपन्यांच्या शंभरावर पुरुष व महिला खेळाडूंनी भाग घेतला आहे.