कोलकाता – बंगाल सरकारने विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा बोजा कमी करण्याच्या मागणीचा भाग म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा बोजा सुमारे 35 टक्क्यांनी कमी केला आहे. त्यांच्या पाठ्यक्रमातून तेवढा भाग वगळण्यात आला आहे.
शिक्षकांनी सांगितले की, कोविड काळात विद्यार्थ्यांचे वर्ग पूर्ण बंद होते त्यामुळे इयत्ता दहावीच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये आता या विद्यार्थ्यांना फार अभ्यास करावा लागणार नाही. बंगाल परीक्षा मंडळाने या संबंधात नमूद केले आहे की, करोना काळात वर्ग बंद होते तसेच ऑनलाइन पद्धतीने जे वर्ग घेण्यात आले त्याचा लाभ सर्वच विद्यार्थ्यांना घेता आलेला नाही.
त्यामुळे त्यांना परीक्षा देण्यात अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी जाधवपूर येथील सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली होती. त्यावर मंडळाने हा निर्णय घेतला आहे.