नवी दिल्ली – बांधकाम क्षेत्रातील मोठा व्यावसायिक ललित गोयल याला आज ईडीने मनि लॉंड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. त्याला गेल्या आठवड्यात अमेरिकेला पळून जाताना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते त्याला आज औपचारीकरित्या अटक करण्यात आली. तो तपास कामात सहकार्य करीत नसल्याने त्याच्या अटकेचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गोयल हा आयआरईओ कंपनीचा प्रमुख आहे. फेमा कायद्याचा भंग केल्याच्या कारणावरून त्याच्या व्यवहारांची सन 2010 सालापासून चौकशी सुरू होती. त्याने देशातील गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे गैरमार्गाने विदेशात पाठवल्याची मुख्य तक्रार आहे. त्याच्या बेकायदेशीर विदेशी गुंतवणुकीची माहिती पॅंडोरा पेपर्स मधूनही बाहेर आली होती.