Royal Challengers Bangalore new jersey :- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या महिला संघाने नुकतेच महिला प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. बंगळुरू फ्रँचायझीचे हे गेल्या 16 वर्षातील पहिले विजेतेपद ठरले आहे. यापूर्वी या फ्रँचायझीला कोणत्याच स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आलेले नव्हते. त्यामुळे या फ्रँचायझीमधील पुरुष खेळाडूंनी महिला संघावर स्तुतीसुमने उधळली.
बंगळुरूचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील महिला बंगळुरू संघाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याने बंगळुरू फ्रँचायझीच्या चाहत्यांचेही कौतुक करताना म्हटले की, जर आयपीएलही जिंकलो, तर ते खूप विशेष असेल. तो अनुभव मला नक्कीच घ्यायला आवडेल असेही तो म्हणाला.
𝗦𝗡𝗔𝗣𝗦𝗛𝗢𝗧𝗦: 𝗥𝗖𝗕 𝗨𝗡𝗕𝗢𝗫 📸
Life’s about creating those core memories, and Johnnie Walker presents #RCBUnbox powered by @Kotak_Life and @Duroflex_world was one such day. ✨
Each photo, iconic; every moment, unforgettable. Here are some pictures as we reminisce with… pic.twitter.com/YwInE48Cr7
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 20, 2024
मंगळवारी येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बंगळुरू फ्रँचायजीचा आरसीबी अनबॉक्स हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुरुष संघाने डब्ल्युपीएल विजेत्या महिला संघाला गार्ड ऑफ ऑनरही दिला. तसेच संघाच्या नव्या जर्सीचेही अनावरण करण्यात आले. यावेळी महिला संघाच्या यशाबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘खूप मस्त, खूपच छान. जेव्हा ते जिंकले, आम्ही सर्वजण पाहत होतो. तो क्षण असा होता, जेव्हा तुम्हाला तुमचा चाहतावर्ग किती शानदार आहे, याची जाणीव होते. त्यांची खरी क्षमता जाणवते. मी असे म्हणतोय, कारण महिला संघ जिंकला तेव्हा असे वाटले की संपूर्ण बंगळुरु शहर जिंकले आहे.’
विनय कुमार हॉल ऑफ फेममध्ये
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि आरसीबी स्टार आर विनय कुमारचा एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलसह आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. विनय कुमार हा आरसीबीचा तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
विराट पुढे म्हणाला, महिला संघ जेवढे सामने खेळला, त्या प्रत्येकवेळी स्टेडियममध्ये चाहत्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. अंतिम सामन्यासाठीही साधारण 30 हजारांपेक्षा अधिक लोक स्टेडियममध्ये होते. त्यामुळे आरसीबीला चाहत्यांचे मिळणारे प्रेम सर्वश्रुत आहे व ते पाहूण नक्कीच आनंद होतो. खरं तर हे प्रेम आरसीबीने दोन वर्षांत कमावलेले नाही, हे चाहत्यांचे गेल्या १६ वर्षांपासूनचे प्रेम आहे.
पहिल्यांदा करंडक जिंकणाऱ्या संघाचा भाग असण्याचा मी प्रयत्न करेल. त्यासाठी मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. मी चाहत्यांसाठी आणि फ्रँचायझींसाठी माझ्या क्षमतेसह आणि माझ्या अनुभवासह जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. महिलांनी करंडक जिंकल्या म्हणून नाही मात्र हा करंडक जिंकणे माझे खूप वर्षांपासूनचे स्वप्न आहे. त्यामुळे आशा आहे की हे स्वप्न यंदा पूर्ण होईल.’
-विराट कोहली, माजी कर्णधार
दरम्यान, आगामी आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघात चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याने आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.आयपीएल जिंकण्याबद्दल विराट म्हणाला, ‘मी नेहमीच इथे असेल. पहिल्यांदा जिंकणाऱ्या संघाचा भाग असण्याचा मी प्रयत्न करेल. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल. मी चाहत्यांसाठी आणि फ्रँचायझींसाठी माझ्या क्षमतेसह आणि माझ्या अनुभवासह जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.’
WPL 2024 : “त्याला माझे नाव…” विराटच्या भेटीनंतर श्रेयंका पाटीलचं ट्विट चर्चेत…
दरम्यान, आगामी आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघात चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याने आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.