नवी दिल्ली – आयपीएल 2023 मध्ये, मोहम्मद सिराजचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या सामन्यापूर्वी सिराजने आपल्या नवीन घरात आरसीबीच्या संपूर्ण टीमला पार्टी दिली. सिराजने हैदराबादमधील ज्युबली हिल्स, फिल्म नगर येथे आपले नवीन घर विकत घेतले आहे. या घरात सिराजने संघातील सर्व खेळाडूंना पार्टी दिली. या पार्टीचे फोटो आरसीबीच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आले आहेत.
एका ट्विटर यूजरने सिराजच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये कोहली आणि फाफ डू प्लेसिस टीमच्या इतर सदस्यांसह सिराजच्या घरात प्रवेश करताना दिसत आहेत. RCB ने ट्रिपचे फोटो देखील शेअर केले आणि लिहिले “हैदराबादी बिर्याणी टाइम..”
Hyderabadi Biryani time! 🥳
The boys took a pitstop at Miyan’s beautiful new house last night! 🏡#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/kEjtB1pQid
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 16, 2023
यावेळी सर्व आरसीबी खेळाडूंनी बिर्याणीवर ताव मारत सिराजच्या कुटुंबियांसोबत संवाद देखील साधला. आयपीएल 2023 मध्ये 12 सामने खेळून आरसीबीचे सध्या 12 गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्याच वेळी, एक सामना गमावल्यास, RCB संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघांच्या सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असेल.
Virat Kohli And RCB team visited Siraj New House Opening In Film Nagar Jubilee Hills , HYD ❤️🔥❤️❤️#ViratKohli #Siraj #RCB #RoyalChallengersBangalore #RCBvsSRH @mufaddal_vohra @CricCrazyJohns @imVkohli pic.twitter.com/8DOzAR56c6
— Tarak Anna || Anil 🖤 (@AnilTarakianNTR) May 15, 2023
राजस्थानविरुद्ध आरसीबीचा संघ जबरदस्त लयीत होता
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आरसीबी संघ उत्कृष्ट लयीत होता. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १७१ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा बचाव करताना राजस्थानचा डाव 10.3 षटकांत अवघ्या 59 धावांत संपुष्टात आला. आयपीएलमधील राजस्थान संघाची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी या संघाने 2009 मध्ये आरसीबीविरुद्ध 58 धावा केल्या होत्या.