GT vs RCB : ‘किंग’ कोहलीच्या आरसीबीवर ‘प्रिन्स’ गिलचे टायटन्स पडले भारी! मागील पराभवाचा ४ विकेट्सनी घेतला बदला
GT vs RCB : या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीचा ४ विकेट्सनी पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला.

GT vs RCB Gujarat Titans win by 4 Wickets : आयपीएल २०२६ च्या ४२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीचा ४ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह शुबमन गिलच्या संघाने चालू हंगामातील आपला पाचवा विजय नोंदवला आहे, तर आरसीबीला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे गुजरातने १५.५ षटकात गाठले.
आरसीबीची खराब फलंदाजी –
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. विराट कोहलीने कगिसो रबाडाच्या एकाच षटकात ५ सलग चौकार मारून तुफानी सुरुवात केली, परंतु तो २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली, तर यष्टिरक्षक जोस बटलरने १९ चेंडूंत ३९ धावा (४ षटकार आणि २ चौकार) काढले, मात्र तरीही संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
Revenge completed in their own backyard! 🏟️
Celebrations in the #GT camp as they seal a much-needed 4️⃣-wicket win over #RCB in Ahmedabad 💙
Scorecard ▶️ https://t.co/I5Hg8ybefh#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRCB | @gujarat_titans pic.twitter.com/qWfAmFUhRP
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2026
आरसीबीचा संपूर्ण डाव १९.२ षटकांत १५५ धावांवर आटोपला. गुजरातकडून अरशद खानने ३.२ षटकांत २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या, तर जेसन होल्डर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. रबाडा आणि सिराजला प्रत्येकी १-१ विकेट्स मिळाली.
कर्णधार गिलची स्फोटक खेळी
#GT 5 down all of a sudden 😲
🎥 A twist in the tale with Romario Shepherd picking two wickets in three balls ☝️☝️
Updates ▶️ https://t.co/I5Hg8ybefh#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRCB | @RCBTweets pic.twitter.com/rXn8wt83iF
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2026
प्रत्युत्तरात १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार शुबमन गिलने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. त्याने केवळ १८ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४३ धावांची धडाकेबाज खेळी केली. साई सुदर्शन लवकर बाद झाल्यानंतरही गिलने संघाला वेगवान सुरुवात मिळवून दिली. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने गिलला बाद करून सामन्यात चुरस आणली, परंतु राशिद खान आणि राहुल तेवातिया यांनी अखेरपर्यंत संयम राखत गुजरातला विजय मिळवून दिला. यासह मागील पराभवाचाही बदला घेतला आणि हंगामातील आपला पाचवा विजय नोंदवला, तर आरसीबीला तिसरा पराभव पत्करावा लागला.





