Shubman Gill Runout : शुबमन गिलच्या रागाच्या उद्रेकाने सामन्यात रंगत! वादग्रस्त रनआउटचा VIDEO व्हायरल

Shubman Gill’s heated argument with umpire video viral in GT vs SRH Match : आयपीएल २०२५ च्या ५१ व्या सामन्यात, गुजरात टायटन्सचा संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादशी सामना करत आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने शुबमन गिलने शानदार खेळीच्या जोरावर २२४ धावांचा डोंगर उभारला. मात्र तो ७६ धावांची खेळल्यानंतर रनआऊट झाल्यानंतर पंचाशी वाद घालताना दिसला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या वादाचं कारण नेमकं काय होतं? जाणून घेऊया.
काय होतं प्रकरण?
शुबमन गिलने ३८ चेंडूत ७६ धावांची जलद खेळी केली पण तो वादग्रस्त रनआऊट झाला. १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली, जेव्हा झीशान अन्सारीने मिडल आणि लेग स्टंप लाईनवर लेंथ बॉल टाकला. स्ट्राईकवर असलेल्या जोस बटलरने तो ऑनसाईडकडे खेळला आणि लगेचच एक धाव घेतली. हर्षल पटेलने चपळाई दाखवत चेंडू पकडला आणि तो किपरच्या दिशेने फेकला.
What’s your take? 👇✍🏻#ShubmanGill seen having a word with the umpire after being given out by the third umpire on a tight call! 👀
Watch the LIVE action ➡ https://t.co/RucOdyBVUf#IPLonJioStar 👉 #GTvSRH | LIVE NOW on SS-1, SS- 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/TPiALXJu8O
— Star Sports (@StarSportsIndia) May 2, 2025
या दरम्यान, प्रकरण खूप नाजूक असल्याने तिसऱ्या पंचांना निर्णय घेण्यासाठी बराच वेळ लागला. रिप्लेमध्ये चेंडू स्टंपवर आदळत असल्याचे दिसून आले, परंतु यष्टिरक्षकाच्या हातमोज्यांमुळे बेल्सही उडत असल्याचे दिसून आले. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक वेळा रिप्ले पाहिल्यानंतर, तिसऱ्या पंचांनी शुबमन गिलल रनआऊट असल्याचा निर्णय दिला. कारण बेल्स स्टंपवरून हलल्या गेल्या होत्या.
हेही वाचा – Virat Kohli : विराटला अवनीत कौरचा बोल्ड फोटो लाईक करणं पडलं महागात, द्यावं लागलं स्पष्टीकरण
लाईव्ह सामन्यात गिलने पंचाशी घातला वाद –
What are your thoughts on this? #IPL2025 #GTvsSRH #ShubmanGill #GujaratTitans #CricketTwitter pic.twitter.com/VBCnH34VLI
— InsideSport (@InsideSportIND) May 2, 2025
मात्र, शुबमन गिल या निर्णयावर पूर्णपणे नाराज दिसत होता. रनआऊट दिल्यानंतर तो रागाने मैदानाबाहेर गेला आणि सामना अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गिलच्या शानदार खेळीमुळे संघ मजबूत स्थितीत पोहोचला, पण त्याचा रनआउट सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.





