GT vs RCB : गुजरातचा बदला की आरसीबीचा दरारा! अहमदाबादमध्ये ‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’ आमनेसामने; पाहा दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड
GT vs RCB : गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील ही लढत केवळ दोन संघांमधील सामना नसून ती 'किंग' विरुद्ध 'प्रिन्स' अशीही मानली जात आहे

GT vs RCB Head To Head : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२६ चा ४२ वा महामुकाबला रंगणार आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील ही लढत केवळ दोन संघांमधील सामना नसून ती ‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’ अशीही मानली जात आहे. किंग कोहलीची आरसीबी जबरदस्त फॉर्म आहे, तर प्रिन्स गिलची गुजरात टायटन्स संघर्ष करताना दिसत आहे,
‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्सची लढाई –
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातसाठी हा हंगाम चढ-उताराचा राहिला आहे. ८ सामन्यांपैकी ४ विजय आणि ४ पराभवांसह गुजरात ८ गुणांनिशी पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गतविजेत्या आरसीबीने ८ पैकी ६ सामने जिंकून प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. त्यामुळे दोघांतील सामन्यापूर्वी दोघांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे? जाणून घेऊया.
मागील पराभवाचा वचपा काढणार का?
– Bhuvneshwar Kumar: 1/31
– Suyash Sharma: 1/36
– Josh Hazlewood: 1/40RCB NEED 206 RUNS TO WIN AGAINST GT 🔥
— Sam (@Cricsam01) April 24, 2026
या हंगामात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येत आहेत. पहिल्या लढतीत आरसीबीने गुजरातचा ५ गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे गिलच्या पलटणीला आता आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर मागील हिशोब बरोबर करण्याची संधी आहे. आकडेवारीचा विचार केला तर, आतापर्यंत या दोन संघांत ७ सामने झाले असून आरसीबीने ४ तर गुजरातने ३ सामने जिंकले आहेत. अहमदाबादच्या मैदानावरील एकमेव लढतीतही आरसीबीनेच बाजी मारली होती, त्यामुळे सांख्यिकीय दृष्ट्या पाहुण्या संघाचे पारडे थोडे जड वाटते.
कोहली-गिलवर खिळल्या नजरा –
हा सामना खऱ्या अर्थाने विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्यातील द्वंद्व मानला जात आहे. विराटने या हंगामात ९००० धावांचा टप्पा पार करत अप्रतिम फॉर्म दाखवला आहे. याउलट, शुबमन गिलच्या बॅटमधून गेल्या काही सामन्यांत मोठ्या धावा आलेल्या नाहीत. गुजरातला विजयाची चव चाखायची असेल, तर त्यांच्या कर्णधाराला मैदानात मोठी खेळी करणे अनिवार्य आहे.





