Virat Kohli Argument : अहमदाबादमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! रजत पाटीदारच्या वादग्रस्त विकेटवर विराट कोहली संतापला; फोर्थ अंपायरशी झाली बाचाबाची
Virat Kohli Argument : आरसीबी प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Virat Kohli Argument with Fourth Umpire Video Viral : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या आयपीएल २०२६ च्या ४२ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारच्या बाद होण्याच्या निर्णयावरून मैदानात मोठा वाद निर्माण झाला. यावेळी डगआऊटमध्ये बसलेला ‘किंग’ विराट कोहली अंपायरवर चांगलाच संतापला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाटीदारच्या कॅचवरून पेटला वाद –
नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आरसीबीची सुरुवात खराब झाली आणि ३५ धावांत दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. ७ व्या षटकाअखेर आरसीबीने २ बाद ७१ धावा केल्या होत्या. आठव्या षटकात अरशद खानच्या गोलंदाजीवर रजत पाटीदारने (१९) डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका मारला.
Virat Kohli and Andy Flower were furious with the umpire over Rajat Patidar’s catch, as the ball clearly touched the ground a poor decision. Krunal looked like he was about to hit the umpire look at his reaction 😂
— ValenceCricket (@CricketValence) April 30, 2026
विराटने अंपायरशी घातला वाद –
It’s heating up in Ahmedabad! 🔥#JasonHolder caught #RajatPatidar at the boundary, but the #RCB camp wasn’t convinced with the decision! 👀#TATAIPL 2026 ➡️ #GTvRCB | LIVE NOW 👉https://t.co/K8vuSzrZ1d pic.twitter.com/GwfAoIelDj
— Star Sports (@StarSportsIndia) April 30, 2026
तिथे उभ्या असलेल्या जेसन होल्डरने धावत जाऊन हा झेल घेतला, परंतु झेल घेताना होल्डरचा हात मैदानावर घासल्याचे दिसले. पंचांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला, ज्याने पाटीदारला बाद घोषित केले. हा निर्णय ऐकून डगआऊटमध्ये बसलेला विराट कोहली प्रचंड नाराज झाला. तो थेट मैदानाबाहेर उभा असलेल्या फोर्थ अंपायरशी (Fourth Umpire) वाद घालताना आणि नापसंती दर्शवताना दिसला. यावेळी मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लावरही त्याच्यासोबत उपस्थित होते. पाटीदारच्या या वादग्रस्त विकेटने संपूर्ण सामन्याचे वातावरण तापवून सोडले.
विराट कोहलीचा आक्रमक खेळ –
5 Consecutive Boundaries by King Kohli 👑 pic.twitter.com/xo2pRN9hR0
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) April 30, 2026
तत्पूर्वी, विराट कोहलीने डावाच्या दुसऱ्याच षटकात कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर सलग पाच चेंडूंत पाच चौकार मारून वादळी सुरुवात केली. पण तो ही सुरुवात मोठ्या खेळीत रूपांतरित करू शकला नाही. रबाडाच्याच एका चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो १३ चेंडूंत २८ धावा (पाच चौकार आणि एक षटकार) काढून बाद झाला.





