RBI On Paytm Payments Bank| रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) फिनटेक पेटीएम पेमेंट्स बँकेला ( Paytm Payments Bank ) 15 दिवसांचा दिलासा दिला आहे. आरबीआयने म्हटले आहे की आता पेटीएम पेमेंट्स बँकेचे ठेव आणि क्रेडिट व्यवहार 29 फेब्रुवारीनंतर 15 दिवस देखील होतील. आजच्या RBI निर्देशानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांच्या खात्यांमध्ये, पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि इतर उत्पादनांमध्ये 15 मार्चपर्यंत ठेवी किंवा पेमेंट स्वीकारले जातील. RBI ने Paytm पेमेंट्स बँकेला भागीदार बँकांकडे ग्राहकांच्या ठेवी काढण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे.
कारवाई का झाली?
31 जानेवारी रोजी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाई केली होती आणि कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली होती. RBI ने त्यावेळी सांगितले होते की पेटीएम पेमेंट बँक (PPBL) ला कोणत्याही ठेवी स्वीकारण्याची परवानगी दिली जाणार नाही किंवा ती कोणतीही प्रीपेड बिल पेमेंट, टॉप अप किंवा वॉलेट किंवा FASTags मध्ये ठेव स्वीकारू शकणार नाही. KYC नियमांचे व्यापक उल्लंघन केल्यामुळे मनी लाँड्रिंगच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने ही कारवाई केली आहे.
या कारवाईचा खुलासा करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास ( RBI Governor ) यांनी चलनविषयक धोरण बैठकीनंतर ( MPC Meet ) पत्रकार परिषदेत सांगितले होते, ‘जर सर्व गोष्टींचे पालन केले असते, तर मध्यवर्ती बँकेने कोणत्याही नियंत्रित संस्थेवर कारवाई का केली असती ?
पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालताना, आरबीआयने म्हटले होते की नियमांचे पालन न केल्यामुळे आणि पर्यवेक्षी चिंतांमुळे, आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला त्यांच्या सेवांमध्ये नवीन ठेव आणि क्रेडिट व्यवहार घेण्यास बंदी घातली आहे. लेखापरीक्षण अहवालात त्रुटी आढळून आल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आल्याचे आरबीआयने निवेदनात म्हटले आहे.
आरबीआयच्या कारवाईनंतर ईडीने फेमा उल्लंघनाची चौकशी केली सुरू –
आरबीआयने कठोर भूमिका घेतल्यानंतर 10 दिवसांच्या आत केंद्रीय तपास संस्था ईडीनेही तपास सुरू केला. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बाबतीत फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) चे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला असून अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) प्राथमिक तपास सुरू केला आहे.
पेटीएम पेमेंट्स बँक ही पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स आणि कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांची संयुक्त उपक्रम असणारी कंपनी आहे.
ही बातमी वाचा – Stock Market | सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 376 ने वधारला, निफ्टी 22 हजार पार
ही बातमी वाचा – Ola Electric Scooter Price| ओला इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 25 हजार रुपयांनी झाली कमी, ऑफर फक्त 29 फेब्रुवारीपर्यंत