रांजणगाव गणपती, कारेगाव दोन दिवस बंद

माझे कुटुंब माझे जबाबदारी अंतर्गत तपासणी मोहिम

रांजणगाव गणपती (पुणे) – रांजणगाव गणपती व कारेगाव या औद्योगिक वसाहती लगतच्या दोन गावांमध्ये दररोज करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने दोन दिवस जनता कर्फ्यूचे नियोजन केले आहे. या दोन दिवसांत आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

रांजणगाव गणपती व कारेगाव येथे दररोज होणारी रुग्णवाढ चिंताजनक आहे कारेगावमध्ये आजपर्यंत 97 करोनाबाधित रुग्ण सापडले तर रांजणगाव गणपती येथे आजपर्यंत 218 करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. 17) व शुक्रवारी (दि. 18) सप्टेंबर रोजी माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. असे ग्रामसेवक किसन बीबे, ग्रामसेवक भाकरे यांनी सांगितले.

या दोन दिवसांमध्ये ग्रामपंचायत प्रशासन, महसूल, आरोग्य विभाग व शिक्षक दोन दिवस गावांमध्ये आरोग्य तपासणी करणार असून या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.