राजस्थानातील चंबळ नदीत बोट उलटली; पाच जणांचा मृत्यू

कोटा – राजस्थानच्या बुंदीमधील चंबळ नदीमध्ये बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण बुडाल्याची शक्यता असून आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर १० जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, राजस्थानमध्ये सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे ही भयानक दुर्घटना घडली. या बोटीमध्ये साधारण ४५ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच उलटली. यावेळी अनेकांनी बुडण्याच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या मारून जाण्याची धडपड केली. तर बोट बुडत असल्याचे पाहून स्थानिकांनीही अनेकांचे जीव वाचवले.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.