Randeep Hooda : अभिनेता रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केल्यानंतर रणदीप त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे.
तो गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत (Lin Laishram) लग्नगाठ बंधनात अडकला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्यानं आपल्या लग्नाची तारीख सोशल मीडियावर शेअर केली होती.
मात्र, आज रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत (Lin Laishram) सात फेरे घेतले आहेत. लग्नसोहळ्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
#WATCH | Manipur | Wedding rituals underway at Chumthang Shannapung resort in Imphal as actors Randeep Hooda and Lin Laishram tie the knot in a traditional Meitei wedding ceremony here. pic.twitter.com/86g6TPFPWG
— ANI (@ANI) November 29, 2023
ज्यामध्ये अभिनेता पारंपारिक मणिपुरी पोशाख परिधान केलेला आणि लग्नाच्या ठिकाणी विवाह विधी करताना दिसत आहे. ज्यामध्ये लिनने एका सुंदर मणिपुरी नववधूची वेशभूषा केली आहे. चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लग्न आणि सर्व विधी मणिपूरमध्ये पार पडले आहेत. तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता की रणदीप हुड्डा पांढऱ्या कपड्यात दिसत आहे. त्याने डोक्यावर सोनेरी किनार असलेला पांढरा फेटा घातला आहे.
रणदीपने त्याच्या कपड्यांवर पांढऱ्या रंगाची शाल घातली आहे. तर वधू लिन पूर्णपणे मणिपुरी ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने खूप वजनदार सोन्याचे दागिने घातले आहेत. फोटो आणि व्हिडीओमध्ये तो त्याचे कुटुंब आणि नातेवाईकांनी घेरलेला दिसत आहे.
लिन ही मणिपूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. रणदीपची बायको ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. रणदीप हुड्डा 47 वर्षांचा आहे, तर लिन लैशराम 37 वर्षांची आहे.
रणदीप हुड्डा यांनी 2021 साली लिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’मध्ये दिसणार आहे.