Donkey Milk Business: गुजरातमधील लोक व्यवसायात अव्वल आहेत, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. माती विकून पैसे कमवण्याची युक्ती त्यांना माहीत आहे. पाटण जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या धीरेन सोळंकी यांना त्यांच्या आवडीची नोकरी न मिळाल्याने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. गाई-म्हशीचे दूध येथे 60 ते 65 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते. धीरेन यांनी दुधाचा अनोखा व्यवसाय निवडला. 5000 ते 7000 रुपये लिटर दराने विकले जाणारे गाढविणीचे दूध विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या दुधाने त्यांनी अडीच कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
नोकरी न मिळाल्याने विकत घेतले गाढव –
धीरेनला शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची होती. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, पण हवी तशी नोकरी मिळाली नाही. त्याला कुठेही मिळालेला पगार त्याचा संपूर्ण खर्च भागवण्यासाठी पुरेसा नव्हता. अशा परिस्थितीत काही कर्ज आणि काही बचतीच्या पैशातून धीरेनने गाढवं खरेदी केली. वास्तविक गाढविणीच्या दुधाच्या व्यवसायाबद्दल त्यानी खूप ऐकले होते. दक्षिण भारतातही डंकी फार्म खूप लोकप्रिय आहे. त्यांनी तेथून गाढवपालनाची संपूर्ण माहिती गोळा केली आणि त्यांच्या गावात येऊन 20 गाढवे खरेदी केली.
गाढविणीचे दूध 5000 ते 7000 रुपये लिटर –
धीरेनने सुरुवातीला 20 गाढविणी विकत घेतली. 22 लाख रुपये खर्चून त्यांनी फार्म हाऊस बांधले आणि सुमारे 43 गाढवांचे संगोपन सुरू केले. पहिल्या चार-पाच महिन्यांत काही विशेष दिसले नाही, पण धीरेनने हार मानली नाही आणि काम करत राहिले. गाई-म्हशीच्या दुधापेक्षा गाढविणीचे दूध 70 पटीने महाग आहे. गाई-म्हशीचे दूध 60 ते 65 रुपये लिटर, तर गाढविणीचे दूध 5 हजार रुपये लिटरने विकले जाते. गाढविणीच्या दुध व्यवसायामुळे ते आता दरमहा 3 ते 4 लाख रुपये कमावत आहेत.
गाढविणीच्या दुधाची मागणी –
गुजरातपेक्षा दक्षिण भारतात गाढविणीच्या दुधाला जास्त मागणी असल्याचे धीरेनच्या लक्षात आले. कोणताही विलंब न लावता त्याने आपली उत्पादने ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली. त्याला कर्नाटक आणि केरळमधून भरपूर ऑर्डर मिळू लागल्या. वैयक्तिक वापराव्यतिरिक्त, कॉस्मेटिक कंपन्या गाढविणीच्या दुधाच्या ग्राहक आहेत. दुधाशिवाय तो गाढवाचे दूध सुकवतो आणि त्याचे पावडर विकतो. या पावडरलाही मोठी मागणी आहे. एक किलो पावडर दुधाची किंमत एक लाख रुपयांपर्यंत जाते.
कुठे वापरले जाते –
गाढविणीच्या दुधात प्रथिने आणि चरबी कमी असते, परंतु लैक्टोजचे प्रमाण जास्त असते. हे दूध सामान्य दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे. हे सौंदर्य प्रसाधने आणि फार्मास्युटिकल उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळेच त्याची मागणी आणि किंमत दोन्ही खूप जास्त आहे.