नवी दिल्ली – कॉंग्रेसने शुक्रवारी रिपुन बोरा आणि जेबी माथेर यांना अनुक्रमे आसाम आणि केरळमधून राज्यसभेचे उमेदवार घोषित केले आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोरा आणि माथेर यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे, असे पक्षाच्या निवेदनात म्हटले आहे.
31 मार्च रोजी सहा राज्यांमधील राज्यसभेच्या 13 जागांसाठी निवडणूक होणार आहे. आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, नागालॅंड आणि त्रिपुरा येथील सदस्य 2 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत, तर पंजाबमधील पाच सदस्य 9 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
आसाम आणि केरळात प्रत्येकी एक खासदार निवडून आणण्या इतके कॉंग्रेसचे संख्याबळ आहे. पंजाबात मात्र आम आदमी पक्षाचे मोठे संख्याबळ असल्याने त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लॉटरीच लागणार आहे.