राजगुरूनगर (पुणे) – राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 7) झालेल्या लोकअदालतीमध्ये प्रलंबित 2231 पैकी 159 दावे तडजोडीने मिटवण्यात आले तर 16 कोटी 8 लाख 50 हजार 387 रुपयांची वसुली झाली. दाखलपूर्व 3621 पैकी 600 प्रकरणे मिटवण्यात आली असून त्यापोटी 57 लाख 90 हजार 1 रुपयांची वसुली झाली. या लोकदलात मध्ये 35 पक्षकार असलेल्या दावा तडजोडीने मिटवण्यात आला.
राष्ट्रीय लोक अदालतीचा शुभारंभ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. अंबळकर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. पाखले, के. एच. पाटील, जी. बी. देशमुख, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आर. डी.पतंगे, डी. बी. पतंगे, पी. ए. जगदाळे, एन. एस. कदम खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नवनाथ गावडे, ऍड. संतोष दाते, ऍड. ललित नवले, सचिव ऍड. गोपाल शिंदे, ऍड. रेश्मा भोर, लोकल ऑडिटर ऍड. संदीप दरेकर, बारचे सदस्य ऍड. अबूबकर पठाण, ऍड. निलेश देशमुख, ऍड. प्रतिभा होले, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. पोपटराव तांबे, ऍड. बी. एम. सांडभोर, ऍड. माणिक पाटोळे, माजी अध्यक्ष ऍड. अरुण मुळूक, ऍड. देविदास शिंदे, ऍड. प्रमोद सहाणे यांच्यासह वकील बारचे सदस्य, तालुक्यातील ग्रामपंचायती, विविध बॅंकांचे अधिकारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुभारंभानंतर न्यायाधीश राजूरकर यांनी वकील, पक्षकार यांना मार्गदर्शन केले. पॅनल सदस्य म्हणून ऍड. योगेश मोहिते, ऍड. माया डांगले, ऍड. कृष्णा भोगाडे, ऍड. सुवर्णा ढोरे, ऍड.अपेक्षा धुमाळ, ऍड. अर्चना राक्षे, ऍड. आदिनाथ कड, ऍड. वैभव कान्हुरकर यांनी काम पहिले. विधी सेवा समितीचे विशाल महाजन, प्रतीक वडगावकर, एस. डी. जोशी यांनी न्यायालयाचे कामकाज पहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. नवनाथ गावडे यांनी केले. सूत्रसंचालन खेड बार असोसिएशनच्या सदस्या ऍड. रश्मी वाघुले यांनी तर ऍड. गोपाल शिंदे यांनी आभार मानले.