मुंबई – निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी लसीकरणाविरोधात नुकतेच वक्तव्य होते की, मी स्वतः लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही, असे ते नाशिकमध्ये एका किर्तनात म्हणाले. त्यांचा या विधानावरून ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या या विधानांचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं होतं.
इंदुरीकर महाराज म्हणाले,’मी घेतली नाही आणि घेणारेही नाही करोनावर एकच उपाय…’
आता मात्र इंदूरीकर महाराज स्वत: लसीकरणासाठी जनजागृती करताना दिसणार आहेत. लसीबाबत नकारात्मक विचार सांगणारे इंदूरीकर महाराज स्वत: नागरिकांना लस घेण्यासाठी प्रबोधनातून प्रोत्साहन देताना दिसणार आहेत.
दरम्यान, लसीबाबतच्या त्यांचा नकारात्मक विधानावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन असे पत्रकारांशी बोलतांना म्हंटले होते. त्यानुसार टोपे यांनी टोपे यांनी इंदूरीकर महाराज यांच्याशी संपर्क करून त्यांना याबाबत चर्चा केली आहे. या चर्चेनंतर आता लस घेऊ नका म्हणणारे इंदूरीकर महाराज स्वत: नागरिकांना लस घेण्यासाठी प्रबोधनातून प्रोत्साहन देताना दिसणार आहेत.
संबंधित बातमी
‘इंदुरीकर महाराजांना लसीचे महत्त्व पटवून देईन’- आरोग्यमंत्री राजेश टोपे