पुणे – राज्यशासनाच्या आदेशानुसार शहरातील नवीन निवासी मिळकतींना कर आकारणी करताना 1970 पासून दिली जाणारी 40 टक्के करसवलत महापालिकेने रद्द केली आहे. तसेच, 2019 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा 40 टक्के सवलतीचा फरक भरण्यासाठी तब्बल 95 हजार पुणेकरांना नोटीसा बजाविण्यात आली आहे. पुणेकरांवर लादण्यात आलेल्या अन्यायकारक निर्णया विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणेकरांसाठी सरसावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ठाकरे या बाबत पुणेकरांना दिलासा देणारा निर्णय राज्यशासनाने घ्यावा अशी केली.
भाजपला मोठा धक्का; “हे’ माजी मंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश https://t.co/x7gyat25Hd
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022
शासनाने महापालिकेस 2011 मध्ये पत्र पाठवित हा निर्णय घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र,वेळोवेळी राजकीय दबावापोटी प्रशासनाकडून हा निर्णय टाऴण्यात आला, तसेच शासनाच्या आदेशाबाबत संभ्रम निर्माण करत या निर्णयाची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली, तसेच हा निर्णय पुणेकरांवर अन्यायकारक ठरणार असतानाही राजकीय पक्षांकडून तो शासनाकडून रद्दही करून न घेता तो तसाच प्रलंबित ठेवण्यात आला, मात्र, महापालिकेची मुदत संपून पालिकेत प्रशासकराज सुरू होताच, पालिका प्रशासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. तर 95 हजार नागरिकांना फरकाच्या नोटीसा देण्यात आल्या.
Andheri Bypoll: लोकं मला बहुमतानं विजयी करतील; ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विश्वास https://t.co/MZEhRaMwBe
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022
त्यावरून राजकीय पक्ष तसेच शहरातील नागरिक आक्रमक झाल्याने महापालिका आयुक्तांनी तांत्रिक चुकीमुळे हे मेसेज गेल्याचे सांगत पुढील निर्णय होई पर्यंत नागरिकांनी ही फरकाची रक्कम भरू नये असे आदेश काढले. मात्र, या आदेशाला दिड महिना झाला तरी महापालिकेकडून शासनाकडे याबाबत बैठक घेण्याचे दिलेले पत्र, भाजपसह सर्वच राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांनी दिलेली पत्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागितलेली वेळ अशा वेगवेगळया घटकांकडून मागणी होऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या निर्णयासाठी बैठक घेऊन दिलासा देण्यास वेळकाढू पणा केला जात असल्याचे चित्र आहे.
भाजप उमेदवार मुरजी पटेल 6 वर्ष निवडणूक लढवू शकत नाहीत, उमेदवारी रद्द होणार?, ठाकरे गटानं घेतला आक्षेपhttps://t.co/N5mGP8mfSg
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022
त्यात, आता मनसे अध्यक्षांनी या विषयात लक्ष घालत थेट मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले असल्याने मुख्यमंत्री शिंदे ठाकरे यांच्या मागणीकडे तरी लक्ष देऊन पुणेकरांना दिलासा देणार का याबाबत उत्सूकता आहे.