CM Eknath Shinde | ‘वर्षा’वर भेटीगाठींना वेग; राज ठाकरेंनंतर काँग्रेसचे तीन बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Updated On:

CM Eknath Shinde – मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर Varsha Bungalow आज राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thakrey यांनी, मुख्यमंत्र्यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा नेमका तपशील उपलब्ध होऊ शकला नसला तरी यामागे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक By-election in Andheri East Assembly Constituency असल्याचं बोललं जातंय.

शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर राज ठाकरे हे लववकरच अंधेरी पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाचा पाठिंबा भाजप उमेदवार मुरजी पटेल यांना जाहीर करतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे – शिंदे भेटीची चर्चा ताजी असतानाच आता काँग्रेसचे तीन नेतेही वर्षा निवासस्थानावर पोहोचल्याने याबाबतही चर्चा सुरु झालीय आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thakrey एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर काँग्रेस नेते व माजी मंत्री वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा व अमिन पटेल या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे आणखी काही नेते देखील उपस्थित होते.

भाजपला मोठा धक्का; “हे’ माजी मंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेमकी कशासाठी भेट घेतली याचाही तपशील अद्याप जाहीर झालेला नसला तरी शाळेच्या पटसंख्येबाबत सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी व मतदारसंघातील कामांसाठी ही भेट असावी अशी माहिती मिळाली आहे. CM Eknath Shinde Varsha Bungalow

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभेत विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक लागली आहे. येथे भाजपच्या चिन्हावर मुरजी पटेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. दोन्ही उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आजपासून प्रचारास सुरुवात केली आहे. येत्या ३ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

2026-10-06 21:59:12

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

2026-10-05 22:33:48

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

2026-10-05 18:22:37

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ