नवी दिल्ली- राहुल गांधी यांनी गुरुवारी गोव्यात दोन कुत्र्याची पिले दत्तक घेतली. जॅक रसेल जातीचे 3 महिन्यांचे पिल्लू त्यांनी आपल्यासोबत दिल्लीत आणले. तर दुसरे पिल्लू नंतर आणले जाणार आहे.
बुधवारी रात्री 11 वाजता राहुल गोव्यात पोहोचले. गुरुवारी ते एका डॉग शेल्टरमध्ये गेले आणि तिथे दोन पिले पसंत केली. राहुलने आधी प्रतिनिधी पाठवून पिल्लांची विचारपूस केली होती. नंतर ते स्वतः तिथे पोहोचले आणि एका पिलू घेऊन दिल्लीला परत आले. उत्तर गोव्यातील म्हाप्सा येथील कुत्र्याच्या एका शेल्टरमधून त्यांनी ही पिले घेतली आहेत.
शिवानी पित्रे या पतीसोबत हे शेल्टर चालवतात. शेल्टरप्रमुख शिवानी यावेळी म्हणाल्या, “विमानतळावर जाताना राहुल काही वेळासाठी आले होते. खूप वेळ ते कुत्र्यांशी खेळत होते. ते अत्यंत साधे आणि विनम्र आहेत.’ या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे गोवा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर आणि इतर नेत्यांचीही भेट घेतली.