मुंबई – अनेकदा क्रिकेटसाठी फिटनेस महत्वाचा आहे असं सांगितलं जात. त्यासोबतच तुमचं वय जास्त असेल तर तुम्ही दमू शकता आणि अनफिट होऊ शकता म्हणून अनेकदा जुन्या सिनिअर खेळाडूंना बाहेरचा रास्ता दाखवला जातो. परंतु एक खेळाडू याला अपवाद ठरला आहे. शरीराने अतिशय लठ्ठ असणाऱ्या या खेळाडूने असा कारनामा करून दाखवला आहे की त्याच्यासमोर अनेक फिट खेळाडू देखील कमी पडतील.
रहकीम कॉर्नवॉलने 27 सप्टेंबर 2022 च्या संध्याकाळी जबरदस्त कारनामा केला. क्वालिफायर वन हा कॅरिबियन प्रीमियर लीग म्हणजेच CPL 2022 मधील सामना होता. बार्बाडोस रॉयल्स आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्सचा संघ आमनेसामने होते. रहकीम या सामन्यात बार्बाडोस रॉयल्सचा भाग होता. गयानाने या सामन्याचा टॉस जिंकून बार्बाडोसला प्रथम बॅटिंग करण्यास सांगितलं. रहकीमने डावाची सुरुवात करत आक्रमक बॅटिंगचा तडाखा काय असतो हे सर्वांना दाखवून दिले.
Rahkeem produces a sensational performance to get the @Dream11 MVP for the first Qualifier match. He smacked 91 runs, including 11 sixes and he took 2 wickets!! #CPL22 #BRvGAW #CricketPlayedLouder #Dream11 #BiggestPartyInSport pic.twitter.com/2nU6T4xzjf
— CPL T20 (@CPL) September 27, 2022
रहकिम कॉर्नवॉलची खेळी इतकी तुफान होती की त्यात एक, दोन किंवा तीन नव्हे तर 11 षटकारांचा पाऊस पाडला. या 11 षटकारांच्या जोरावर या खेळाडूने अक्षरशः मैदान गाजवले. पुढे २ आणखी चौकार ठोकत पट्ठ्याने अवघ्या १३ बॉल्समध्ये ७४ रन्स ठोकले. रहकीमने ऐकून 54 चेंडूत 91 धावा केल्या मात्र त्याचे शतक हुकले. रहकीमच्या या स्फोटक खेळीमुळे बार्बाडोस रॉयल्सने प्रथम खेळताना 20 षटकांत 5 बाद 195 धावा केल्या. प्रत्युत्तरात 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गयाना अॅमेझॉन वॉरियर्सचा संघ 17.4 षटकांत 108 धावांत गारद झाला.