PYC-HDFC Racquet LEAGUE 2024 – पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत स्पिअर्स संघाने विजेतेपद संपादन केले. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत स्पिअर्स संघाने रॉकेट्स संघाचा ३८०-३०६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
सामन्यात टेबल टेनिसमध्ये रुचा अंबिके, अनिरुद्ध साठे, रोहन छाजेड, तुषार नगरकर, तेजस किंजवडेकर, ईशान लागु, ओंकार वैद्य, प्रियदर्शन डुंबरे, संजय शहा, कल्पक पत्की, अक्षय ओक, साकेत गोडबोले यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्पिअर्स संघाने रॉकेट्स संघाचा १७६-१४४ असा पराभव करून आघाडी घेतली.
बॅडमिंटनमध्ये ईशान लागु, तुषार नगरकर, अक्षय ओक, रोहीत मेहेंदळे, अभिषेक ताम्हाणे, सौरभ प्रभुदेसाई यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्पिअर्स संघाने रॉकेट्स संघाचा १७४-१४१ असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. टेनिसमध्ये अभिषेक ताम्हाणे, अनिरुद्ध साठे यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर स्पिअर्स संघाने रॉकेट्स ३०-२१ असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय क्लबच्या सदस्य आशुतोष देशपांडे, राधिका देशपांडे यांचे वडील माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांच्या स्मरणार्थ बॅडमिंटन, टेनिस, टेबलटेनिसमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार विजेत्या खेळाडूला १०,००० रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागू , एचडीएफसी बँकेच्या रिटेल विभागाचे विभागीय प्रमुख राहुल कुलकर्णी, रिलेशनशिप बँकिंग विभागाचे मुख्य मनोज पहूजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे, बॅडमिंटन व टेबलटेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे, तुषार नगरकर, रणजित पांडे, दिप्ती सरदेसाई, केदार नाडगोंडे, नंदन डोंगरे आदी उपस्थित होते.