पुणे – धनकवडी-आंबेगाव पठारमधील धनकवडीच्या शेवटच्या बसथांब्याजवळ “विठु माझा लेकुरवाळा’ हे शिल्प उभारण्यात आले आहे. नगरसेविका वर्षाताई तापकीर यांच्या संकल्पनेतून आणि स्व. उत्तमरावजी भिंताडे फाऊंडेशनचे गणेशदादा भिंताडे यांच्या माध्यमातून हे शिल्प उभारण्यात आले आहे. श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज व देहू संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे, ह.भ.प. माऊली महाराज जंगले व खडकवासला विधानसभा मतदार संघाचे भीमराव तापकीर यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी धनकवडी – आंबेगाव पठार परिसरातील संप्रदाय समुदयातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी अखंड वारकरी संप्रदायाचे प्रतिक असलेले हे प्रेरणादायी व प्रत्येकाला नवीन उर्जा देणारे शिल्प उभारल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तर ह.भ.प. माऊली महाराज जंगले यांनी धनकवडी गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री जानुबाई माता चरणी आणखी एक मानाचा तुरा अर्पण करत धनकवडी बसस्टॉपला भक्ती शिल्प म्हणून नवीन ओळख करून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने नगरसेविका वर्षाताई तापकीर व युवा नेते गणेशदादा भिंताडे यांचे अभिनंदन केले.
आमदार भिमराव तापकीर म्हणाले, धनकवडी परिसराला वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. हे लक्षात घेऊन “विठू माझा लेकुरवाळा” भक्ती शिल्पाच्या माध्यमातून धनकवडीचे वारकरी संप्रदायाचे ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
यावेळी ह.भ.प. संतोष महाराज मोरे, ह.भ.प. मालुसरे सर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिगंबर डवरी, मा. नगरसेविका मोहिनीताई देवकर, खडकवासला विधानसभा मतदार संघाचे युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बदक, अभिषेक तापकीर, आप्पासाहेब धावणे, संदीप बेलेदरे, रणधीर गायकवाड, माऊली पांचाळ, सत्यवान कामथे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रामकृष्ण चिंचकर, किरण जोशी, उमेश खंडेलवाल, मनोज नाईक, नितीन पायगुडे, गणेश दिघे, विशाल पोमण, अरविंद पोमण, विक्रांत तापकीर, श्रेयस फुगे, नवनाथ शिंदे, काळुराम चव्हाण, कृष्णा भंडारी, अशोक देशमाने, केतन यादव, स्वप्निल क्षीरसागर, कानिफनाथ शिंदे, तुषार गायकवाड, सचिन यादव, आकाश लोंढे, मयुर दातीर, शुभम सुरगुडे, करण शहा, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.