पुणे – पुर्व वैमनस्यातून दोघांवर जीवघेणा हल्ला करत परिसरातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना घोरपडे पेठेतील नेहरू मित्र मंडळ येथे घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पाच ते सात जणांवर खूनाचा प्रयत्न तसेच कोविड 19 उपाययोजना कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अभिषेक उर्फ बाप्पा कसबे (31,रा.मनपा कॉलनी, घोरपडे पेठ) हे त्यांचा मेव्हणा गणेश मोरेसह मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरुन चालले होते. यावेळी आरोपींनी त्यांना चौकात अडवले. लोखंडी तलवार व कोयत्याने अभिषेक यांच्या हातावर, डोक्यावर व पाठीवर मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तर गणेश यास लाथा-बुक्क्यांनी व बांबूने मारहाण करत आम्ही येथले भाई आहोत, जर आमच्या विरोधात कोणी गेला तर आम्ही मुडदे पाडू असा दम दिला. जाताना हातातील कोयते व तलवारी नाचवत वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बोबडे तपास करत आहेत.