प्राधिकरणाचा अधिकारी असल्याचे सांगत साडेअकरा लाखाची फसवणूक

पुणे – निगडी प्राधिकरणातील अधिकारी असल्याचे सांगत एका टुरिस्ट व्यवसायीकाचे तब्बल 11 लाख 60 हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी नवाज देशमुख (30,रा.खराडी) यांना आरोपीने निगड प्राधिकरणात सब डिहिजनल ऑफिसर असल्याचे सांगितले. त्याला तसे महाराष्ट्र शासनाचे बनावट ओळखपत्रही दाखवले. यानंतर त्याच्याकडून इनोव्हा व फॉर्च्युनर गाडी भाड्याने घेतली. या गाडीचे भाडे सुरवातीला दिले.

यानंतर तब्बल वर्ष दिड वर्षाचे 11 लाख 60 हजार रुपये भाडे थकवले. तसेच फिर्यादीच्या तीन साथीदारांना जुन्या गाड्या स्वस्त:त देतो असे सांगून त्यांच्याकडून ऍडव्हांस पैसे घेऊन फसवणूक केली. तर इतर दोघांनाही रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.