पुणे :- दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीचे स्वागत केले. सामाजिक सलोखा जपण्यासाठी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असल्याचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.
मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने मुस्ताक पटेल, ऍड. मारूफ पटेल, युसुफ बागवान, हाजी इकबाल तांबोळी, रशिद शेख, बाबर शेख, ईकबाल दरबार, सय्यद अली, शबाना देशपांडे सालेम, जिया खान यांनी मानाच्या बाप्पांचे शाल, श्रीफळ देऊन आणि अत्तर लावून स्वागत केले.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती व दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतींची पालखी या बांधवांनी खांद्यावर घेतली.