महाराष्ट्र केसरी स्पर्धकाचे लाख मोलाचे कौतुक
वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी एक वर्षा पूर्वी वाघोली येथील गावातील आखाड्यात सिकंदर शेख ह्या पहिलवानास महाराष्ट्र केसरी बनल्यास एक लाख रुपये इनाम जाहीर केला होता.
सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्याबद्दल राजेंद्र सातव पाटील यांनी दिलेला शब्द पाळत वाघोली गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याचा इनाम देत ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. या वेळी वाघोली गाव चे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील, अंतरराष्ट्रीय पंच मारुती सातव पाटील,माजी सरपंच शिवदास उबाळे,
हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, औरंगाबाद केसरी मेघराज कटके, राष्ट्रपती पदक विजेते जान महंमद पठाण, दत्ता कटके, दौलत पायगुडे, बाळासाहेब गवळी, रामदास काळे, चिराग सातव पाटील,कैलास बापू सातव, नटराज सातव पाटील, पै संदीप तात्या शिंदे,पै गणेश तांबे, सचिन काळे, योगेश सातव,नंदकुमार दरेकर, संतोष पायगुडे, अनिल सातव पाटील,सुनील जाधवराव, मयूर अडसरे, नवनाथ सातव पाटील, पिंटू कटके, संतोष हरगुडे, संदीप जाधवराव,मंगेश सातव पाटील, सुनील कावडे, प्रदीप सातव पाटील,मोहन सातव पाटील,अब्बास शेख, व अतुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
खेळाडूंना दिले जाणारे बक्षीस हे त्यांचे खरे प्रोत्साहन असून खेळ व खेळाडूंसाठी ते प्रेरणादायी आहे. राजेंद्र सातव पाटील यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम राबवल्याबद्दल ग्रामस्थांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
राजेंद्र पायगुडे, शिवसेना नेते ठाकरे गट, पुणे जिल्हा