वाघोली (प्रतिनिधी) :- भाजप नेते राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली प्रादेशिक योजनेतील 30 मी रुंदीचा खांदवेनगर जकात नाका ते कटकेवाडी (प्रजिमा 56) येथे पुणे नगर रस्त्यास वाघोली बाह्यवळण करून जुळणारा रस्ता करण्यासाठी पीएमआरडीए आयुक्त राहुल मेहवाल यांची भेट घेत माजी उपसरपंच संदीप सातव यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
संदीप सातव यांनी सांगितले की, आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली प्रादेशिक योजनेतील 30 मी रुंदीचा खांदवेनगर जकात नाका ते कटकेवाडी (प्रजिमा 56) येथे पुणे नगर रस्त्यास वाघोली बाह्यवळण करून जुळणारा रस्ता करण्यासाठी पीएमआरडीए आयुक्त राहुल मेहवाल यांची भेट घेत चर्चा केली आहे.
वाघोली गावाची लोकसंख्या सुमारे तीन लाखांच्या आसपास पोहचली असून या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जिल्हाभर गाजत आहे. वाघोली मधून पुणे-नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग जात असून या महामार्गावर रांजणगाव, सणसवाडी, कोरेगाव एमआयडीसी आहे.
वाघोली लोणीकंद, भावडी, फुलगाव, इतर भागात मोठ्या प्रमाणावर क्रेशर आहेत. याची वाहतूक करणारे अनेक गाड्या आहेत, अनेक शाळा, महाविद्यालय, कॉलेज, गोडाऊन, असल्यामुळे मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. पुणे-शिरूर रस्त्यावर ट्रॅफिक काउन्ट दिवसाला 66,746 आहे. वाघोली साठी कोणताही बायपास नाही.
वाघोली बाह्यवळण करून जुळणारा रस्ता करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
– संदीप सातव(माजी उपसरपंच, वाघोली)
पुणे- नगर रस्त्यावरील वाघोली येथील वाहतूक कोंडीची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. पीएमआरडीएकडून पर्यायी रस्ता म्हणून दक्षिण बाजूस 30 मी रुंदीचा प्रादेशिक योजनेतील रस्ता प्रस्तावित केला आहे.
हा रस्ता करणे अत्यंत गरजेचे असून असा रस्ता झाला तर वाघोलीमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल यासाठी आयुक्त यांची भेट घेत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती संदीप सातव यांनी दिली.