पुणे पीपल्स को-ऑप. बॅंकेच्या अध्यक्षपदी ऍड सुभाष मोहिते

पुणे – पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंक, या मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह बॅंकेच्या माजी अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ सभेत बॅंकेच्या अध्यक्षपदी ऍड सुभाष विठ्ठल मोहिते तर उपाध्यक्षपदी सुभाष विष्णूदास गांधी यांची निवड करण्यात आली.

अध्यक्ष ऍड सुभाष मोहिते हे पुणे शहरातील प्रतिष्ठीत वकील असुन पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष, इंडियन सोसायटी फॉर स्टडीज्‌ इन को-ऑपरेशन पुणे या संस्थेचे संचालक, रामराज्य सहकारी बॅंकेचे संस्थापक व तज्ञ संचालक, पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक म्हणून काम पहात आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्‍स असोसिएशन, मुंबईचे माजी संचालक म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. उपाध्यक्ष सुभाष गांधी हे पुणे शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी असुन मे. भगवानदास तुळशीदास आणि कंपनी या फर्मचे भागीदार, विषनेमा महाजन मंडळाचे अध्यक्ष आहेत.

22 शाखा व 1 विस्तारीत कक्षासह बॅंकेने दिनांक 31.03.2021 अखेर एकूण व्यवसाय 2019 कोटीचा टप्पा पार केला आहे. बॅंकेस रु.15 कोटी 22 लाख निव्वळ नफा झाला असुन बॅंकेचे निव्वळ एनपीए 0.77% व सी.आर.ए.आर.14.11% एवढा आहे. एटीएम सुविधा, सर्व शाखा संगणकीकृत, ग्राहकांसाठी फंड ट्रान्सफरच्या आधुनिक सुविधा या वैशिष्टयांसह बॅंक कार्यरत आहे. अहवाल वर्षासाठी सभासदांना 12.00% दराने लाभांश देण्यास वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुर दिली असल्याची माहिती अध्यक्ष ऍड सुभाष मोहिते यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.