पुणे– राष्ट्रपतींचे गुणवत्तापुर्ण सेवेबाबतचे पदक यंदा पुणे शहर पोलीस दल आणि ग्रामिण पोलीस दलातील एकाही कर्मचारी आणि अधिकाऱ्यास प्राप्त झाले नाही. येरवडा कारागृहातील एका कर्मचाऱ्यास मात्र हे पदक प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र कारागृह विभागातील खालील अधिकारी आणि कर्मचारी यांना २६ जानेवारी २०२४ करिताचे राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक केंद्रीय गृह विभागाकडून जाहिर करण्यांत आले आहे.
रुकमाजी भुमन्ना नरोड ( तुरुंगाधिकारी श्रेणी-१, अहमदनगर जिल्हा कारागृह), सुनिल यशवंत पाटील (तुरुंगाधिकारी श्रेणी-१, तळोजा मध्यवर्ती कारागृह), बळीराम पर्वत पाटील ( सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह), सतिष बापुराव गुंगे ( सुभेदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), सुर्यकांत पांडूरंग पाटील ( हवालदार, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह), नामदेव संभाजी भोसले ( हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), संतोष रामनाथ जगदाळे ( हवालदार, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह).
नवनाथ सोपान भोसले ( हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), विठ्ठल श्रीराम उगले ( हवालदार, अकोला जिल्हा कारागृह) . ज्या अधिकारी कर्मचा-यांना राष्ट्रपतींचे सेवापदक घोषित झाले आहे, त्यांचे कारागृह विभागाचे वतीने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक ( कारागृह व सुधारसेवा) जालिंदर सुपेकरनी अभिनंदन केले आहे.