अस्थिव्यंगांना वानवडीच्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार

पुणे – वानवडी येथील अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्रातील निवासी शाळेत अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापिका शिवानी सुतार यांनी केले आहे.

या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षांपेक्षा कमी व सोळा वर्षांपेक्षा अधिक नसावे व 40 टक्के अपंगत्व असलेलेच विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. अपंगत्वाचा दाखला, रेशनकार्ड, जन्मदाखला, तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला आदी विविध कागदपत्रे प्रवेश अर्जासोबत सादर करणे आवश्‍यक आहेत.

या शाळेत मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह असून मोफत भोजन, निवास, गणवेश व शालेय साहित्य मिळणार आहे. शिवणकला, सुतारकला, संगणक, हस्तकला, कौशल्य विकास या व्यवसायांचे तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.