पुणे –एमपीएससीने पीएसआय पदांसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर केली. त्यावरून मिळालेल्या गुणांवरून आणि एकूण पदांचा विचार करता आपण पीएसआय परीक्षेच्या उत्तीर्ण होणारच अशी खात्री असलेल्या उमेदवारांनी मंगळवारी जल्लोष केला. तब्बल तीन वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत मेरिट लिस्टमध्ये आपले नावे आल्याने शहरात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 (पोलिस उपनिरीक्षक) परीक्षाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. एकूण 496 पदांसाठी ही परीक्षा झाली. त्यापूर्वी याची पूर्व परीक्षा मार्च 2019, तर मुख्य परीक्षा जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये झाली होती. मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणीसाठी एकूण 1 हजार 41 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्याची यादी आज गुणवत्ता यादी जाहीर झाली. यातून गुणाक्रमाने 496 उमेदवारांची निवड होणार आहे. त्यामुळे कोणते उमेदवार पीएसआय उत्तीर्ण होऊ शकतील, याची अंदाज बांधता येऊ शकते. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या उमेदवारांना आपली निवड होणार आहे, हे निश्चित होताच त्यांनी व सहकाऱ्यांसोबत शहरातील विविध अभ्यासिका, चौकात जल्लोष केला.
या परीक्षेची पूर्व व मुख्य परीक्षा 2019 मध्येच झाली होती. मात्र, आरक्षण आणि करोनामुळे शारीरिक चाचणीची परीक्षा वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळे पात्र उमेदवार शारीरिक चाचणीच्या प्रतीक्षेत होती. तीन वर्षे उलटली, तरी अद्यापही निकाल जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी होती. आता मात्र यादी प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पीएसआय परीक्षा देण्याची ही पहिलाचा प्रयत्न होता. मात्र, पहिल्याच परीक्षेत पीएसआय उत्तीर्ण झाल्याचा आनंद आहे. ग्रामीण भागातून येऊ पुण्यात योग्य पद्धतने परीक्षेची तयारी केल्याने यश मिळाला. शिवाय, तीन वर्षांनतर प्रसिद्ध केलेल्या यादीवरून उत्तीर्ण झाल्याचा आनंद वेगळाच आहे. मुलाखतीत राज्यात सर्वाधिक गुण मिळाले आहेत. – अर्चना सातपुते, आटपाडी, जि.सांगली
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुणवत्ता यादी आल्याने खूप छान वाटत आहे. लॉकडाऊन काळात आम्हाला मैदाने उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे गावी राहूनच आम्ही शारीरिक चाचणीची तयारी केली. आम्ही केलेले कष्ट फळाला आल्याची भावना आहे. – अमित बंडगर, पात्र उमेदवार
“ऑप्टिंग आऊट’साठी 8 दिवस मुदत
पुणे, दि. 8 -महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 (पोलीस उपनिरीक्षक) परीक्षाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय निवडण्यासाठी एमपीएससीने 16 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे.
एमपीएससी 2019 ची ही पूर्व परीक्षा मार्च, तर मुख्य परीक्षा त्याच वर्षातील सप्टेंबर महिन्यात घेतली होती. एकूण 496 पदांसाठी ही परीक्षा पार पडली. मात्र मध्यतरी आरक्षण, करोनाचा प्रादुर्भाव यामुळे शारीरिक चाचणीची परीक्षा होऊ शकली नाही. तब्बल तीन वर्षानंतर आज गुणवत्ता यादी एमपीएससीने आज प्रसिद्ध केली. जाहीर करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरुपाची असून, उमेदवारांच्या अर्जातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो.