पुणे – सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्चतर्फे (एससीपीएचआर) आयोजित ‘सूर्यदत्त ग्लोबल फार्माकॉन २०२३’चे उद्घाटन शनिवारी (दि.९) सकाळी ११ वाजता बन्सीरत्न सभागृह, सूर्यदत्त बावधन कॅम्पस येथे होणार आहे.
यावेळी जेनरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया असणार आहेत, अशी माहिती ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी दिली.
चोरडिया म्हणाल्या, “संस्थांतील सहकार्य व समन्वय अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने फार्मा तज्ज्ञांचे वार्षिक स्नेहसंमेलन असलेल्या या ‘फार्माकॉन’मध्ये फार्मा उद्योगातील तज्ज्ञ, उद्योजक, फार्माचे विद्यार्थी, शिक्षक आदी सहभागी होणार आहेत. यावेळी अर्जुन देशपांडे यांना फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सूर्यदत्त धन्वंतरी ग्लोबल आयकॉन अवॉर्ड-२०२३’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
‘फार्मसी उद्योगातील नामवंत व्यक्तींशी, विद्यार्थ्यांच्या संवादाची ही उत्तम संधी असणार आहे. फार्मसी क्षेत्रात करिअर करणाऱ्या इच्छुकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चची स्थापना २०२३ मध्ये करण्यात आली आहे.”