जिल्ह्यातील 355 शाळा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आजही बंद
पुणे – पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील 355 शाळांना आणि अंगणवाड्यांना संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हा परिषदेने शाळांना दोन दिवसांची सुटी जाहीर केली आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.20) आणि शुक्रवारी (दि.21) बंद राहणार बंद राहणार आहेत. मात्र, या शाळांना सुट्टी देण्यात आली असली तरी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना आपापल्या शाळांवर उपस्थित रहावे लागणार आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. देशमुख यांनी बुधवारी रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. शाळांबरोरच अंगणवाड्याही बंद ठेवल्या जाणार आहेत.
या आदेशानुसार या भागातील सर्व अंगणवाडी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, सर्व मंडळांच्या अनुदानित व खासगी शाळांना सुट्टी असणार आहे. जिल्ह्यातील अन्य भागातील शाळा व अंगणवाड्या सामान्यपणे सुरू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सुट्टी दिलेल्या शाळा
आंबेगाव तालुक्यातील – 73. बारामती – शून्य. भोर – 36. दौंड – शून्य. हवेली – शून्य. इंदापूर – शून्य. जुन्नर – 35. खेड – 36.
मावळ – 48. मुळशी – 67. पुरंदर – 17. शिरूर – शून्य. वेल्हे – 43. एकूण शाळा – 355