शिक्रापूर -येथील बजरंगवाडी येथे हॉटेलसमोरून रस्ता ओलांडणाऱ्या मन्सूर निजाम सय्यद याचा मद्यधुंद चालकाच्या टेम्पोची धडक बसून जागीच मृत्यू झाला. पुणे-नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथे मन्सूर सय्यद रस्ता ओलांडत असताना पुणे बाजूने भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोची (एमएच 16 एई 3724) मन्सूरला जोरदार धडक बसून तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान, जखमी मन्सूरला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी मन्सूर निजाम सय्यद (वय 27, सध्या रा. बजरंगवाडी शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत अमोल बापू नप्ते (वय 32, फरा करंदी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी गंगाधर लक्ष्मण जाधव (वय 34, रा. करंजेनगर, शिक्रापूर, जि. पुणे) याच्याविरद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.