पुणे -पुणे आणि मुंबई शहरादरम्यान मागील पाच वर्षांपासून बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी लोहगाव विमानतळ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. विविध एअरलाईन कंपन्यांशी बोलणी सुरू असून मुंबईत स्लॉट उपलब्ध झाल्यास ही सेवा सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
ही सेवा सुरू झाल्यास पुण्यातून मुंबईला फक्त 25 ते 30 मिनिटांमध्ये पोहचण शक्य होणार आहे. दिवसाला 180 ते 190 विमानांची ये-जा असते. यामधून साधारण 25 ते 30 हजार प्रवासी प्रवास करतात. लोहगाव विमानतळावरून परदेशात दुबई, सिंगापूर आणि बॅंकॉक याठिकाणी विमानसेवा सुरू आहे.