इंदापूर – जुनी पेन्शन मिळणे हा खरतरं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांसह इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्यासंदर्भात ग्रामसभेचा आवश्यक असलेला ठराव या शासननिर्णयात शिथिलता आणावी, या मुद्द्यांसह वीस पटाच्या आतील शाळा बंद करू नये. त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नेमणूक करण्यात येऊ नये. अशा प्रश्नांचा विधानसभेत पाठपुरावा करू असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिक्षक मेळाव्यात केले.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाने इंदापूर तालुकास्तरीय शिक्षक मेळाव्याचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या नुतन सभागृहात केले होते. उद्घाटन आमदार दत्तात्रय भरण यांनी केले. अध्यक्षस्थानी कास्ट्राइबचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी भूषविले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुहास मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील भोसले, ज्योती भोसले यांनी केले. गौतम कांबळे म्हणाले, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कास्ट्राइब महासंघ तत्पर आहे. राज्यस्तर, जिल्हा स्तरावरील शिक्षकांच्या प्रश्नाचा पाठपुरावा तातडीने होईल. बदली धोरण राबवण्यासाठी शिक्षक महासंघ अग्रेसर आहे.
मेळाव्यात 35 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार, 8 शिक्षक जोडप्यांना ज्योतिबा सावित्री पुरस्कार, 8 जणांना विशेष प्रतिभा संपन्न पुरस्कार देण्यात आहे. आमदार दत्तात्रय भरणे आणि राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांना महात्मा फुले यांची पगडी घालून सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय ठोंबरे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नाना नरूटे, इब्टाचे तालुकाध्यक्ष सहदेव शिंदे, शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष सतीश शिंदे, शिक्षक संघ शिवाजीराव गटाचे तालुकाध्यक्ष अनिल रुपनवर, नानासाहेब दराडे, किशोर वाघ,
हरिभाऊ तरंगे राज्य महासचिव विठ्ठल सावंत राज्य सल्लागार दिगंबर काळे चंद्रकांत सलवदे, जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, जिल्हा महासचिव मिलिंद देडगे कृष्णा हेळकर, बाळकृष्ण खरात उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत मखरे, सदाशिव रणदिवे, सुधाकर आव्हाड, बालाजी कलवले, रतिलाल कुचेकर, संभाजी सूर्यवंशी, सुनील निकम, नितीन रमेश मिसाळ, नितीन दिलीप मिसाळ, स्नेहल सोनवणे,
आशा सोनवले, रत्नमाला सरगुले, स्मिता मोरे, सचिन लोंढे, सुप्रिया वनकळस, तात्या मसलखांब, सोमनाथ धनवडे, नितीन साबळे भीमराव चंदनशिवे, स्नेहल गायकवाड, दिलीप कांबळे, अनिल गायकवाड, संतोष कांबळे, विश्वास पोळ, विदेश कांबळे अरुण कांबळे, विद्यासागर गायकवाड यांनी परिश्रम घेतले. मनीषा ननवरे यांनी आभार मानले.
या आहेत मागण्या
प्रास्ताविकामध्ये तालुकाध्यक्ष सुहास मोरे यांनी शिक्षकांचे प्रश्न मांडले. शिक्षकांकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे. जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे. मुख्यालयी राहण्यासंदर्भात असलेली ग्रामसभेतल्या च्या ठरावाची अट रद्द झाली पाहिजे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा सीसी व्याजदर 9 टक्के करा. सीसीचे नूतन नूतनीकरण दर तीन वर्षांनी करावे. वीस पटांच्या आतील शाळा बंद करू नका. आदी मागण्या मांडण्यात आल्या.