– निलकंठ मोहिते (प्रतिनिधी)
इंदापूर : लाखेवाडी ता. इंदापूर येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तसेच प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल मधील दोन दिवशीय मल्हार महोत्सव हजारो पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा झाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न असावा लागतो . नृत्य, नाट्य, संगीत, क्रीडा हा मनुष्य जीवनाचा एक भाग आहे. नृत्य ही सर्वात प्राचीन कला मानली जाते. नृत्य ही कलांची जननी आहे.
नृत्य ही एक 64 कलांपैकी असलेली एक कला आहे. 200 हून अधिक लोकनृत्य ही भारतामध्ये प्रचलित असून कला ही अत्यंत खोलवरची आणि टिकाऊ अशी संपर्कक्रिया आहे. मानवाच्या जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्व आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडायचे असेल तर अभिजात कला ही मानवाला तारक ठरते.
पुस्तकी ज्ञानाच्या जोडीला सुप्त गुणांचा विकास होणे महत्त्वाचे आहे . सुप्तगुणांमुळेच विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न होतो. या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रामलल्ला प्रतिष्ठान चे सादरीकणसह कोळीगीते, पोवाडा, गोंधळीगीत, भक्तिगीते, लोकनृत्य, देशभक्तीगीते, योगकला, कीर्तन, हुंडाबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, लेक वाचवा लेक घडवा, आधुनिक तंत्रज्ञानाची अतिशयोक्ती अशा विविध प्रकारचे मनमोहक व थरारक नाट्याविष्काराचे सादरीकरण मल्हार महोत्सवात करण्यात आले. प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमामध्ये पालकांसाठी लकी-ड्रॉ चे आयोजन करण्यात आले यामध्ये पालकांना आकर्षक बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे सुहास चौरे, सूर्यकांत कोकणे पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन, विक्रांत खाडे रेंज फॉरेस्ट ऑफिसर, सचिन छगनलाल ओंबासे जिल्हाधिकारी धाराशिव, व दिलीप ढोले सह व्यवस्थापकीय संचालक, अभिजीत सानप सहसंचालक रक्षा मंत्रालय भारत सरकार, सुजाता ढोले अति.आयुक्त मंगेश देसाई प्रसिद्ध सिने दिग्दर्शक,
प.पु. देशमुख गुरुजी वेदमूर्ती वास्तुतज्ञ व ज्योतिषाचार्य तसेच संस्थेचे प्रमुख अध्यक्ष श्रीमंत ढोले, लाखेवाडी गावच्या सरपंच व संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेच्या सहसचिव पौर्णिमा खाडे, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदिप गुरव, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पवार ,संस्थेचे प्राचार्य राजेंद्र सरगर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ,पालक, यांच्या उपस्थितीत हा मल्हार महोत्सव सोहळा सोहळा उत्साहात पार पडला.