पुण्यातून एकूण नऊ विमाने रद्द
पुणे – दिल्लीतील धुक्यांमुळे विमानसेवेत अनेक अडथळे येत असून, गुरूवारी (दि. 28) धुक्यामुळे पुणे ते दिल्ली दरम्यानची चार ड्डाणे रद्द झाली. तर अन्य मार्गावरील विमानसेवेवरही परिणाम झाला असून, काही विमानांना एक तासांपर्यंत उशीर झाला.
मागील दोन दिल्लीत दाट धुके पडत असल्यामुळे विमानांच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. दिल्लीमध्ये पहाटे पासून ते दुपारपर्यंत धुक्याचा परिणाम राहत आहे. त्यामुळे बुधवारी सहा ते सात विमांना उशीर झाला होता. गुरूवारी तर वेगवेगळ्या कंपन्याची चार विमाने धुक्क्यामुळे रद्द करण्यात आली.
तर, इतर पाच ते सहा विमानांना साधारण अर्धा ते एक तासांचा उशीर झाला. प्रामुख्याने पहाटे पासून ते दुपारी बारापर्यंतच्या विमानांना यामध्ये समावेश आहे. धुक्यामुळे दोन दिवसांपासून पुणे दिल्ली आणि दिल्ली पुणे विमानांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
पुण्यातून दिल्लीसाठी सर्वाधिक विमाने धावतात. या मार्गावर वेगवेगळ्या कंपन्याच्या साधारण १५ पेक्षा जास्त विमान सेवा आहेत. पण, दोन दिवसांपासून सकाळच्या टप्प्यातील काही विमानांना उशीर होत आहे. तर, काही विमाने रद्द होत आहेत. त्यामुळे कामाच्या निमित्ताने दिल्लीला जाणाऱ्या व दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या नागरिकांच्या खूपच अडचणी झाल्या आहेत. अनेकांच्या महत्वाच्या मिटिंग व कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे मनस्ताप देखील सहन करावा लागला.
दरम्यान, पुणे विमानतळावरून दिल्लीबरोबरच इतर शहरात जाणारी विमाने गुरूवारी सकाळी रद्द करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने अमृतसर, लखनऊ आणि हैदराबाद जाणारी प्रत्येकी एक विमान रद्द झाले. तर गोव्याला जाणारी दोन विमाने रद्द झाली. खराब हवामानामुळेच ही विमाने रद्द झाल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.