पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता येत्या ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास यंदा लवकर सुरूवात करण्यात आली.त्यामुळे परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. दरम्यान, येत्या दि. ७ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह ८ ते १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.