पुणे – दैनंदिन आर्थिक व्यवहारातील त्रुटी दूर व्हाव्यात. शिवाय, प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करत जगभरात नावाजलेली अद्ययावत संगणकप्रणाली “सॅप’ (सिस्टीम ऍप्लिकेशन अँड प्रॉडक्टस इन डाटा प्रोसेसिंग) सुरू करण्यात आली. यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. पण, या प्रणालीचा अत्यल्प वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभाग व वित्त व लेखा विभागासाठी ही प्रणाली बसविण्यात आली आहे. मात्र, यात केवळ पालिकेचा वित्त विभागच काही ठराविक बाबींसाठीच या प्रणालीचा वापरली जात आहे. त्यामुळे या प्रणालीचा अधिकाधिक वापर करावा अशी मागणी सजग नागरिक मंचाने प्रशासनाकडे केली आहे. या प्रणालीत प्रामुख्याने दैनंदिन जमा खर्च, प्रत्येक विभागाचा जमा खर्च, विकासकामांचा खर्च, महापालिकेचे दैनंदिन बॅलन्सशीट एका क्लिकवर मिळू शकते.
अशी आहे प्रणाली
“सॅप’ प्रणालीचा मुख्य भाग म्हणजे त्यांची उत्तम रिपोर्टिंग सिस्टीम. यात सर्व दैनंदिन आर्थिक व्यवहार तसेच साहित्यांच्या नोंदी केल्या जातात. यातून एका क्लिकवर आर्थिक तसेच महापालिकेच्या भांडार विभागाकडील माहिती मिळते.