पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त प्रभाग क्रमांक ३७ जनता वसाहत, पानमळा वसाहत दांडेकर पूल, दत्तवाडी या भागातील जयंती महोत्सव मंडळांना जिव्हाळा सोशल फाउंडेशनचे राहुल तुपरे (मा. नगरसेवक )यांच्या वतीने संविधान पुस्तकाचे प्रति वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमात शिवसेनेचे विभाग अध्यक्ष सुरज लोखंडे आणि जय मातादी सेवा संघाचे शेखर वाळुंजकर, संतोष फडके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.