उपमुख्यमंत्र्यांकडून शिरूरबाबत कौतुकोद्गार
टाकळी हाजी – पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक व शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्काराने शिरूर तालुक्यातील शिक्षक, शिक्षिकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील सुवर्णा गारगोटे, भाऊसाहेब उचाळे, रोहिदास सोदक, सुशिला बोखारे, प्राजक्ता व्यवहारे, कमल बोडरे यांचा समावेश आहे.
पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शिरूर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत अग्रस्थानी असल्याने तालुक्यातील गुणवत्ता चांगली आहे, असे गौरवोद्गार काढले. शिरूर तालुक्यातच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारे पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये सुवर्णा कैलास गारगोटे यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. त्या न्हावरे शाळेत कार्यरत आहेत.
भाऊसाहेब पोपट उचाळे (जिल्हा परिषद शाळा वसेवाडी), रोहिदास अर्जुन सोदक (जिल्हा परिषद शाळा ढोक सांगवी), सुशिला अशोक बोखारे (जिल्हा परिषद शाळा, पिंपळे खालसा), प्राजक्ता अनिल व्यवहारे (जिल्हा परिषद शाळा शिक्रापूर), कमल दत्तात्रय बोडरे (जिल्हा परिषद शाळा, मलठण) यांना शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी आमदार पोपटराव गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे,
पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, माजी सरपंच दामूशेठ घोडे, माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, मलठण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत गायकवाड, केंद्रप्रमुख शिवाजीराव वाळके, मुख्याध्यापक पाटीलबुवा मिडगुले, अनिल पलांडे, संतोष गावडे, अविनाश चव्हाण, संतोष शेवाळे, कैलास गारगोटे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.