पाबळ – येथील तीर्थक्षेत्रातील पद्मप्रभू श्वेतांबर जैन मंदिरात भगवान पद्मप्रभू मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आचार्य विश्वकल्याण महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने देशभरातून हजारो जैन भाविक पाबळ येथे उपस्थित होणार आहेत. यानिमित्ताने दि. 13, 14, 15 डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. (दि.15) रोजी मंदिराचे द्वार उद्घाटन करण्यात येणार आहे.
यानिमित्त पाबळ जैन सकल संघाकडून हजारो भाविकांच्या निवास, भोजन, सेवा पूजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
आचार्य विश्र्वकल्याण यांच्या उपस्थितीत मांगलीक मंत्रोच्चार विधी होणार आहे. याठिकाणी भव्य गुरुमंदिराचीही उभारणी केली आहे. जैनधर्मातील तीन ज्येष्ठ धर्मगुरूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
पद्मप्रभू जैन तीर्थपेढीचे अध्यक्ष प्रकाश गांधी, उपाध्यक्ष राजेंद्र शहा, सचिव हर्षद गांधी, खजिनदार सुनील राठोड, विश्वस्त सतीश गांधी, प्रकाश शहा, दिलीप जैन, जयेश शहा, कलपेश शहा, भूषण गांधी, केतन शहा, भूषण शहा, गिरीश शहा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
पदमप्रभूंची मूर्ती 180 वर्षापूर्वीची
मूळ मंदिरात भगवान पदमप्रभूंची ही मूर्ती ही 180 वर्षापूर्वीची आहे. या मूर्तीची प्रतिष्ठापणा पाबळ येथील मंदिरात 109 वर्षापूर्वी करण्यात आली होती. पाबळ येथील (स्व) तीलोकचंद राठोड यांना झालेल्या दुष्टांतानुसार त्यांनी मंदिरातील श्रीफळ रुपी अधिष्टायिक (क्षेत्रपाल) वीर मनिभद्र यांची शेंदुराचे साहाय्याने जमेल तशी मुख प्रतिमा साकारली. तीच प्रतिमा आजही भाविकांना भक्तीतून आत्मप्रचिती देऊ लागली. पाबळ येथे भाविकांची मांदियाळी वाढली आहे. जैनधर्मीय भाविकांचे पवित्र तीर्थस्थान म्हणून उदयास आले, अशी माहिती राठोड यांच्या वारसांनी दिली