हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील जैन मंदिराच्या बांधकामासाठी पाया खोदताना जैन धर्मीयांच्या २४ तीर्थंकरांपैकी एक असलेल्या कुंथुनाथ भगवान यांची दगडाची मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती सुमारे १२०० वर्षांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. जैन मुनींच्या मार्गदर्शनानंतरच या मूर्तीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे तेजकुमार झांझरी यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ,येथील जैन मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना मंगळवारी (दि ३१ /०१/२०२३ रोजी जैन तीर्थकारांपैकी सतरावे.तीर्थंकार भगवान कुंथूनाथ यांची मूर्ती आढळली. पार्श्वनाथ भगवान यांचीही दोन फुटी खंडित स्वरूपातील आढळली. मूर्तीही येथील जुन्या जैन मंदिराचा जीर्णोद्धार केला जात असून २६.जानेवारीपासून पायाचे खोदकामास सुरू झाले आहे.
काल हे काम सुरू असताना एक मोठी शिळा आढळली. तेजकुमार झांझरी यांच्या समक्ष सव्वापाच फूट उंची व दोन फूट रुंदीची शिळा वर काढून त्यावरील माती बाजूला केली असता भगवान कुंथूनाथांची मूर्ती असल्याचे लक्षात आले. बाजूला दोन फुटांची पार्श्वनाथ भगवान यांचीही मूर्ती सापडली.
मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर भगवान कुंथूनाथ यांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, १९७२ च्या दुष्काळादरम्यान तलावाचे खोदकाम सुरू असताना भगवान विष्णू यांची मूर्ती आढळली होती. या मूर्तीची.नागनाथ मंदिरात स्थापना करण्यात आली आहे.
जैन मुनींच्या आज्ञेनंतर पुढील निर्णय दरम्यान, औंढा येथे.मंदिराच्या परिसरात मूर्ती सापडल्याची माहिती आचार्य विभवसागर महाराज, आचार्य विशेष सागर महाराज यांच्यासह जैनमुनींना दिली जाणार असून त्यांच्या आज्ञेनुसारच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे झांझरी यांनी स्पष्ट केले आहे.