पारगाव झेडपी शाळेतील स्थिती
पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे पहिली ते चौथी सुमारे ३१३ पट असून शिक्षक मात्र नऊच आहेत. २ शिक्षकांची बदली झाली.
एका शिक्षकांच्या अकाली मृत्यू झाला आहे. पटसंख्येनुसार ११ शिक्षकांची गरज आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या नियमाने जुन्या पटसंख्येनुसार शिक्षक कमी झाले. पट वाढला पण शिक्षक मात्र कमी झाले. सध्या २ शिक्षकांची गरज आहे.
एकीकडे खासगी शाळांच्या स्पर्धेतून विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळवताना स्थानिक व्यवस्थापन समिती प्रयत्न करीत असताना अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे याला खीळ बसताना दिसत आहे.
पारगाव जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या तालुक्यातील इतर शाळेच्या तुलनेत लक्षणीय आहे. शिक्षणाधिकारी पंचायत समिती याकडे तातडीने लक्ष देऊन शिक्षकांची पूर्तता करावी, अशी अपेक्षा पालकवर्गातून होऊ लागली आहे.